जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालय सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे न्याय मिळवून देण्याचे दालन — ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य , मत्स्यव्यवसाय म.रा.
चामोर्शी येथे खासदार अशोकजी नेते यांचे जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयाचे थाटात उद्घाटन.
खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!
प्रतिनिधीः रामचंद्र कामडी
चामोर्शी येथे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयाचे भव्य थाटात उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे झुंझार,तडफदार, लोकनेते, विकास पुरुष,वने सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने खासदार अशोकजी नेते, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल भाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,प्रदेश सदस्य रवींद्र ओल्लालवार,संयोजक प्रा.कादर शेख, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, आदिवासी आघाडीचे नेते संदिप कोरेत, संतोष भाऊ तंगडपल्लीवार व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना वने, सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासह खासदार अशोकजी नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांनी मार्गदर्शन केले
यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना मा. ना, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितले जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालय सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे दालन बनले पाहिजे व भारतीय जनता पक्ष समस्त जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम महाराष्ट्रात करीत आहे
व तसेही चामोर्शी तालुक्यावर माझा विशेष प्रेम आहे व आधीपासूनच चामोर्शीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले ,यावेळी प्रामुख्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी कार्यक्रम चार तास उशीरा कार्यक्रम सुरू होऊन सुद्धा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याबद्दल त्यांनी आभार मानले व उशीरा होऊन सुद्धा आपण कार्यक्रमाची वाट बघितली खरे पक्षाचे शिल्पकार आहात व आपण सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी चामोर्शी शहरात आपण पुन्हा जनसंपर्क कार्यालय व तक्रार निवारण कार्यालयाचे भव्य शुभारंभ केले आहे त्यामुळे पुन्हा चामोर्शी वासिय जनते सोबत माझे नाते पुन्हा घट्ट झाले आहे असे प्रतिपादन यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी केले यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समया पसुला व तालुक्यातील शेकडो नागरिक महिला यांनी खासदार अशोक भाऊ नेते यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भाजपचा दुपट्टा घालून भाजपा पक्ष प्रवेश दिला ,
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर, यांनी केले कार्यक्रमाचे संचालन आशीष भाऊ पिपरे यांनी केले यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील भाऊ वरघंटे, सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष आशीष भाऊ पिपरे शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम , प्रशांत येगलोपवार ,रिंकू भाऊ पालारपवार ,बंगाली आघाडी पूर्व विदर्भ प्रमुख दीपक हलदर , रमेश अधिकारी भाजपा नगरसेविका सौ रोशनी ताई वरघंटे, प्रेमा ताई आईचंवार , कविताताई किरमे, मीनल ताई पालारपवार, शिल्पा रॉय ,भाजपा युवा नेते भुवनेश्वर चुधरी,भाजपा जेष्ठ नेते माणिक कोहळे, विनोद गौरकर,त्रियुगी दुबे, ओबीसी आघाडी नेते संजय खेडेकर,युवा नेते नरेश अल्सावार नीरज भाऊ रामानुजमवार, वासुदेव चीचघरे,प्रकाश सातपुते, राजू धोडरे वासुदेव चीचघरे,विष्णू ढाली ,विलास चरडूके ,राजू भाऊ झाडे ,रेवणाथ कुसराम ,यशवंत त्रिकांडे, राजू भाऊ धोडरे साई गव्हारे अनील बोदलकर अतुल भिरकुरवार, रतन सरकार , दिवाकर कोहळे रवी धोटे, भाविक आभारे ,बंडू सातपुते ,अशोक धोडरे , राजू वरघंटीवार, भास्कर बुरे ,शेषराव कोहळे,निखिल धोडरे ,जीवनदास भोयर ,लक्ष्मण वासेकर , विनोद किरमे,अनिल आक्रेडवार, विकास मैत्र व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,