पांढरवांनी येथे ग्रामजयंती प्रचार, प्रसार व जनजागृती कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
रामनवमीच्या शुभपर्वावर श्री गुरुदेव सेवा मंडळ पांढरवानी येथे सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित राहुन ग्रामजयंती प्रचार, प्रसार व जनजागृती कार्यक्रमाची दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला कि राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रध्दा व विचारसरणी होती. समाजातल्या प्रत्येक घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता होती.
ग्रामोन्नती व ग्रामकलयाण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांनां पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्या कशा सोडवाव्यात या विषयी उपाययोजनाही सुचविली. ती अतिशय परीणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगाना प्रोत्साहन मिळावे,प्रचारकांच्या रुपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे प्रतिबिंब ग्रामगितेत उमटले आहे.याविषयीचे मार्गदर्शन गजानन ठाकरे यांनी केले.या कार्यक्रमाला सुधाकर पिसे,टिकाराम वाघमारे,शतृघन नन्नावरे, अरविंद देवतळे, निलकंठ धारणे, आनंदराव कडुकार, भास्कर गजभे,अजाबराव घरत, समस्त गावकरी उपस्थित होते.