नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण उपचाराविना परत
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
आधीच महागाईची चणचण आणि त्यात न परवडणारे खाजगी औषधोपचार. अशा स्थितीत गोरगरीब जनसामान्यांचे रुग्ण उपचाराचे आधार स्थान म्हणजे सरकारी दवाखाना. खूप अपेक्षा घेऊन विश्वासाने रुग्ण या सरकारी आरोग्य केंद्रात येतात. पण जर उपचारच झाले नाही तर?.. अशीच घटना प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे घडली.
गोरगरीब रुग्ण, कधी हातचे काम टाकून तर कधी मोलमजुरी करून झाल्यावर दुपारी प्रा. आ. केंद्र नेरी येथे उपचारासाठी येतात. दुपारच्या वेळी हे आरोग्य केंद्र ०४:०० वाजेपासून ते ०५:०० वाजेपर्यंत असते. दि. १२/११/२०२१ रोज शुक्रवारी दुपारी रुग्ण आरोग्य केंद्रात आले. उपचार लवकर व्हावा म्हणून वेळेच्या आधी येऊन बसलेले हे रुग्ण ५ वाजेपर्यंत वाट बघून बिनाउपचारानेच परत गेले. झाले असे की, दवाखान्यात डॉक्टर नर्स वेळेवर हाजर होते. चिट्टी काढा आम्ही उपचार करतो असे त्यांचे म्हणणे होते. पण उपचार घेण्यासाठी जी पाच रुपयांची चिट्टी काढावी लागते ती नोंदविणारे कर्मचारी नव्हते. रुग्ण त्यांची वाट बघत ताटकळत होते. इतर कर्मचार्यांस चिट्टी साठी विनवणी केली असता ही दुसऱ्याची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार झाले नाही. कारण चिट्टी नोंदविणारे कर्मचारी हे पूर्वसूचनेशिवायच गैरहजर होते. काही रुग्ण तर आदल्या दिवशीपन आले होते आणि याच कारणामुळे त्यांना तेव्हाही उपचाराविनाच परत जावे लागले होते. आजही ते तसेच परत गेले.
चिट्टी नोंदविणारे कर्मचारी पूर्वसूचनेशिवाय गैरहजर असतात आणि रुग्णांना गैरसोय होऊन उपचाराविना परत जावे लागते. उपस्थित रुग्णांणी रोष व नाराजी व्यक्त करून हतबल मनाने वापस जाताना याकडे गंभिरतेने लक्ष वेधण्याची विनंती केली आणि संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य कारवाही व्हावी असे मत व्यक्त केले.