ताज्या घडामोडी

वरोरा येथील सद्भावना एकता मंच तर्फे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा

वरोरा :- स्वच्छता हीच खरी सेवा. स्मशानभूमी व कब्रस्ताना स्वच्छता अभियानास सुरवात. वरोरा येथील सद्भावना एकता मंच तर्फे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश !!!!!!!
सदभावना एकता मंच व सदभावना युवा एकता च्या संयुक्त विद्यमाने दि. १९ डिसेंबर २०२१ पासून कब्रस्तान व स्मशानभूमी स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आली . रविवारी व सरकारी सुटीचे दिवशी सकाळी ८-०० ते २-०० पर्यंत स्वच्छता अभियान वरो-यातील वरोरा शहरातील सर्वच कब्रस्तान व स्मशानभूमितील वाढलेला कचरा साफ होईपर्यंत सुरु रहाणार आहे . आज दि. १९ डिसेंबरला या अभियानाची सुरवात वणी नाका स्मशान भूमितून करण्यात आली . आज वणीनाका स्मशानभूमीसोबतच सलिमनगर कब्रस्तानातील कचरा साफ करण्यात आला . यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड उपस्थित होते .व सदभावना संपूर्ण टीम या स्वच्छता अभियानात सहभागी झाली होती . वाढलेला कचरा झाडं झुडपं मशिनद्वारे कटींग करुन त्याचे ढीग लावून कचरा जाळण्यात आला .सदभावना एकता चे. नगरसेवक जैरुदीन.छोटूभाई शेख , गोपाळ गुडधे , इक्बाल भाई रंगरेज अरुण उमरे , सचिन मेश्राम , ओम चावरे , विजय आंबेकर , भारत तेला , सचिन राऊत यांनी संपूर्ण अभियानाचे नियोजन केले . या अभियानाच्या माध्यमातून सदभावनाच्या संपूर्ण टीमने आपसी भाईचारा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला . सदभावना युवा एकताचे गिरीष ढवस , प्रजय धोटे , राज गुडधे , आकाश नक्षिने , शुभम् वानखेडे , सुरज राऊत , विनोद काळसर्पे ,रुषी बोबडे , विनित बोबडे , प्रणय परचाके , लोकेश बोबडे , गणेश चिंचोलकर , सागर चिंचोलकर , अनिरुद्ध ठावरी , आयुष मडावी व उत्कर्ष मत्ते पूर्णवेळ उपस्थित राहून अभियानात सहभागी होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close