हरवलेल्या तिनं वर्षाच्या चिमुकलीला .एन.सी.सी च्या मुलीने केले पोलीसांच्या स्वाधिन
एन.सी .सी.च्या मुलीचे पोलीस अधिकाऱ्यांनी केले कौतुक .
प्रतिनिधीःसंजय नागदेवे तिरोडा
तिरोडा शहरात वाढत असलेल्या लहान बालके हरवलेल्या चे अनेक घटना घडत आहेत परंतु काल घडलेल्या घटने मध्ये एन .सी.सी दोन मुलींना एक मोठा यश आला असून त्यांची शहरात व तालुक्यात जोमात चर्चेचा विषय बनला असून सर्व त्र कौतुक होत आहे
प्राप्त माहितीनुसार तिरोडा शहरातिल पोलीस स्टेशन समोर एक अनोळखी चिमुकली तिनं वर्षाची फिरत असताना तिला त्या समोरील दोन एन.सी.सी.च्या मुली दिसल्या त्यावेळी त्या चिमुकली न त्यांच्या कडे धाव घेतली व त्या मुलीना मिठी मारली . त्या दोन्ही मुली नी तिला विचारना केली असता ममी पपा ना्व सांगायची सदर एन.सी.सीच्या कु.प्लाक्षा संजय नागदेवे या.नवेगाव खुर्द .कु.तॄप्ती मानीकदास मोरे ह्या दोन्ही मुली नी त्या चिमुकलीला पोलीस स्टेशन ला नेवुन पोलीसांच्या स्वाधीन केले . त्यावेळी ठाणेदार देवदास कटारे यांनी पोलिसांचा चक्र फिरवून अवघ्या अर्ध्या तासात त्या चिमुकलीला तिच्या आई वडिलांना बोलावून त्यांना दिले .व एन.सी.सीच्या दोन्ही मुली चा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे . पोलीस निरीक्षक देवदास कठाळे यांनी त्याचा भरपुर कौतुक केले त्या दोन्ही मुली नी आपल्या यशाचे श्रेय एन सी सी शिक्षक सुनील शेंडे यांना दिले.