जागतिक पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार यांना “कृतज्ञता सन्मान” पुरस्कार बहाल
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप कलाकुंज गृपच्या सुप्रसिद्ध कवयित्री कु.अर्चना दिलीप सुतार यांना दि. १९ एफ्रिलला “समाज प्रबोधन चारिटेबल ट्रस्ट” आणि “वुमन्स लिबर्टी चॅरिटेबल ट्रस्ट” यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात सन २०२३चा “कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कवयित्री सुतार ह्या सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील मूळ रहिवाशी असून त्या एक शिक्षिका आहे.
समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा लेखक जयंत हिरे लिखित “भारतातील 100 कर्तुत्ववान महिलांची यशोगाथा” या पुस्तकात सुप्रसिद्ध कवयित्री(अर्चना सुतार )यांच्या जीवनाचा आढावा घेऊन त्यांच्या आज पर्यंतच्या सर्व कार्याची माहिती या पुस्तकात नोंद केली आहे. सदरहु पुस्तकाचे मुखपृष्ठ अनावरण कार्यक्रमात सामाजिक,कला,साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणांऱ्या व स्वतःचे आयुष्य कवितेच्या माध्यमातून समाजासाठी झोकुन देणाऱ्या समाज प्रबोधन आणि वुमन्स चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने प्रख्यात वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर कवयित्री कु.अर्चना सुतार यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे उपरोक्त पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे . त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.दरम्यान मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक,वर्षा कोंगरे , प्रतिभा पेंदाम,संध्या धांडे ,कविता कुरैवार कु.किरण साळवी, कु.प्रियंका जगझाप , वंदना बरडे, वंदना निरांजने ,मोनिका इसाने ,रश्मि पचारे ,सरोज हिवरे या शिवाय वर्षा शेंडे , वंदना हातगांवकर, भाग्यश्री हांडे , सविता भोयर,विजया त़त्वादी , रसिका ढोणे , मंथना नन्नावरे, मुग्धा खांडे , रजनी रणदिवे, स्मिता बांडगे , वंदना आगरकाठे ,मेघा मिलमिले, वर्षा आत्राम, शारदा झाडे, सुवर्णा कुळमेथे, चैताली आत्राम, नंदिनी लाहोळे, यांनी देखील कु. अर्चना सुतार यांचे अभिनंदन केले आहे.