ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वनविभागाच्या वतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर. यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी

सोमवार 14 जून रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात वनविभागाच्या वतीने वृषरोपन कार्यक्रम घेण्यात आला वनविभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यात यावर्षी 20 लाख वृक्ष लागवडीचे उदिष्ट ठेवण्यात आले असून यावर्षी प्रजन्यमान निसर्गाच्या अनुकूल असून मान्सूनने परभणी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा 98 टक्के पासून होण्याचा अंदाज वर्तवल्याने या वर्षी परभणी जिल्हा वन विभागाच्या वतीने जिल्हा भरात 20 लाख झाडे लावण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती परभणी जिल्हाधिकारी दिपक मुंगळीकर यांनी दिली आहे.
आज पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्वरूवात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते 150 झाडे लावण्यात आले असून त्यांचे संगोपन करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी कचव्हे यांनी दिली आहे यावेळी वन विभागाचे अधिकारी काशीनाथ भंडारी , सुनीता नरवाडे , ऋषिकेश चव्हाण , वन विभागाचे कर्मचारी रामराव राठोड , श्याम भराडे , लक्ष्मण राठोड आदींची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close