सर्पमित्राने दिले सापाला जीवनदान
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
दिनांक 9 नोव्हेंबर 2022 ला चिमूर तालुक्यातील नेरी येथील बाजार चौकातील परिसरात जतीन कन्फेशनरी यांचे दुकानासमोरील ठेवलेल्या मिठाच्या बॅगामध्ये नागिन घुसल्याचे जाणारा येणाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी दुकान मालक गिरडकर यांना याची माहिती दिली. साप खरंच बॅगामध्ये घुसला की नाही याची खात्री झाल्यानंतर गिरडकर यांनी भ्रमणध्वनीवरून सर्पमित्र मुन्ना शेख यांना माहिती दिली त्याने क्षणाचा विलंब न करता आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून सापाला पकडून जीवदान दिले. मुन्ना शेख यांचे कार्यकर्ते सुदर्शन बावणे व गोलु शेख येतपर्यंत साप तिथून निघून विशाल कॅम्पुटर च्या दुकाना जवळ आला. साप बघणाऱ्यांची गर्दी खूप असल्यामुळे सापाला कोणी मारणार तर नाही ना याची दक्षता घेण्यात आली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पोहचून सापाला पकडण्यात आले. साप नागिन असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. सापाच्या सेफ्टी ला जखम असल्यामुळे त्यांनी समोरील उपचार करण्यासाठी घेऊन गेले अशा प्रकारे आज नागीन सापाला सर्प मित्रांकडून जीवदान देण्यात आले.