केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस तेल व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढ निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची मुल येथे स्वाक्षरी मोहिम सह धरणे आंदोलन
तालुका प्रतिनिधी : हमंत बोरकर मुल
भारत देशावर अधिराज्य करीत असलेल्या भाजप प्रणित केंद्र सरकारने स्वयंपाक करणाऱ्या गॅस डिलेंल,खाद्य तेल,व जीवनावश्यक वस्तूंचे दुप्पटीने भाव वाढ केल्याने देशातीलच गरीब व सर्वसाधारण कुटुंबियांचे कंबरडे मोडले असून केंद्र शासनाचे नेतृत्व करीत असलेल्या मोदीं सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सर्वसामान्य जनेतीची स्वाक्षरी मोहीम मुलच्या गांधी चौकात घेण्यात आली आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. समोर शेतकऱ्यांचे कल्याण, बेरोजगारांना रोजगार, वाढत्या महागाईचा विरोध करण्यासाठी मुल तालुका कांग्रेस, व शहर कांग्रेस,महिला कांग्रेस,युवक कांग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमे निमित्य मुल येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा जि. प.माजी अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात भाववाढी विरोधात निषेध व धरणे आंदोलनात मोदी सरकार हाय-हाय, ” वारे मोदी तेरा खेल-सस्ती दारू महेंगा तेल” मोदी सरकारला खाली करा-भाववाढ कमी करा असे महिलांनी,पुरुषांनी नारे देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्याच कार्यकाळात पेट्रोल 100/-च्या वर, डिझेल 96/- गॅसची किंमत 350/- वरुन 830/ ते-900/-खाद्य तेल 170/- यांसह जीवनावश्यक वस्तूची भरमसाठ भाववाढ केली आहे. तशीच 232 /-रुपये मिळणारी सबसिडी फक्त 36/- केली. त्यामुळे महिलांना गॅस घेणे कठीण झाले असून प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक बजेट डबघाईस आले. ग्रामीण भागातील उज्वला गॅस घेणाऱ्या गरीब महिलांजवळ सिलेंडर भरण्यासाठी 830/- रुपये नसल्याने स्वयंपाक कसे करावे या विवनचनेत सापडले असून महागाईमुळे गरीबांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याने भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वात तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, भेजगावचे सरपंच व बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, उपसभापती संदिप कारमवार, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, गुरुदास चौधरी, डाकट्टर पद्माकर लेनगुरे, माजी जी.प.अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, किसान सेलचे तालुका अध्यक्ष रुमदेव गोहणे, ग्रामीण कांग्रेसचे प्रमुख दीपक पा. वाढई, बंडू गुरनुले, गुरू गुरनुले, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, शहर कांग्रेसचे अध्यक्ष सुनील शेरकी, पुल्लकवार, महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार कृष्णा सुरमवार , रत्ना चौधरी, माधुरी शातलवार,माजी जी.प.सदश मंगला आत्राम, वेदांती कांकडलवार, शुभांगी कोतपल्लीवर नगर सेविका लीना फुलझेले, राजेंद्र वाढई, विवेक मुत्यालवार, सरपंच रवी कामडे, सुमित आरेकर, अनिल निकेसर, प्रदीप कामडे, धनराज रामटेके, सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, अन्वर शेख, अशोक मारगोणवार, गौरव पूपरेड्डीवार, संतोष वाढई, नरेश गुडलावार, आशिष बरेवार, पंकज शेंडे, रिकेश मलोडे, उद्धव मंदाडे, यांचेसह ग्रामीण व शहरी असंख्य कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.