बॅ.असदुद्दीन आवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मानवत येथे जाहीर निषेध

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथे एम. आय. एम .पक्षाच्यावतीने माननीय तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये नमूद आहे की दिनांक 3 जानेवारी रोजी एम. आय. एम. पार्टी चे सर्वेसर्वा बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या जीवघेणी हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषींना त्वरित अटक करून आगामी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पारदर्शक पणे पार पाडाव्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावे कायदा व सुव्यवस्था कायम करण्यात यावी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नकुल वाघुंडे ,यांना देण्यात आले
यावेळी तालुका अध्यक्ष सय्यद समीर ,प्रभारी तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक ,शहराध्यक्ष इलियास पठाण, सोऐब बागवान, एजाज खान, रशीद बेग, हबीब भडके ,शेख सुलतान, शेख वाजेद, मुजीब फारुकी, सद्दाम बागवान, शब्बीर खान, सय्यद रईस, एम.आय.एम. पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.