माणुसकीचा धर्म पाळत आमदार अब्दुल्लाखाॅन उर्फ बाबाजानी दुर्राणी यांनी दिला मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मंगळवारी आंतरवाली सराटी येथे आंदोलकांची आ.दुर्राणी यांनी कार्यकर्ते समवेत घेतली भेट.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे येथे मंगळवारी आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी माणुसकीचा धर्म पाळत आंदेलकांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला.दरम्यान येथील मराठा बांधवांवर लाठीचार्जचा त्यांनी निषेध व्यक्त केला.याप्रसंगी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचेसह कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटे येथील समाजसेवक मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली होत असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनात मराठा बांधवांवर लाठीचार्ज झाला.या पार्श्वभूमीवर आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी जाऊन भेट दिली. समाजसेवक मनोज जरांगे यांचेशी चर्चा केली.आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा यावेळी आ. दुर्राणी यांनी निषेध व्यक्त केला. यासोबत शासनाने आंदोलकांवरील गुन्हे बिनशर्त पाठीमागे घ्यावेत व मराठा आरक्षण प्रश्न तातडीने सोडवावा यासाठी त्यांनी या आंदोनास पाठिंबा दिला आहे.यावेळी याप्रसंगी बाजार समिती सभापती अनिलराव नखाते, नारायणराव आढाव,शिध्देश्वर शिंदे,गणेश दुगाणे,राधाकिशन कणसे,विष्णुपंत काळे,विष्णु सिताफळे,रामप्रसाद कोल्हे यांची उपस्थिती होती.