पुरवठा सहाय्यक अमित गेडामचा मृतदेह मिळाला
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्यात काल (शुक्रवार दि.२८जूलैला) सकाळच्या वेळेस पुलावरुन एक कार वाहुन गेल्याची दूदैवी घटना घडली.दरम्यान या घटनेतील ती कार घटनास्थळावरुन एक किलोमीटर अंतरावर काल मिळाली असून आज सकाळी शनिवारला घटनास्थळावरुन दोन कि.मी.अंतरावर अमित गेडाम यांचा मृतदेह मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान कार वाहून गेल्या नंतर शोध पथकाची युध्द स्तरावर शोध मोहीम सुरू होती .काल घटनेची माहिती होताच गोंडपिपरी उपविभागीय अधिकारी व पोंभूर्णा तहसिलदार यांनी या घटनेची माहिती जाणून घेतली.पुरवठा सहाय्यक अमित पांडुरंग गेडाम यांच्या मालकीची ही कार असल्याचे चौकशी अंती कळले .सदरहु घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे कळते कि मूल तालुक्यातील कोसंबी येथील अमित गेडाम हा मूळ रहिवाशी असून तो गेल्या सहा ते सात वर्षांपासून तहसिल कार्यालय पोंभूर्णा येथे कार्यरत होता.सध्या त्याच्याकडे पोंभूर्णा गोडाऊनचा कार्यभार होता .या शिवाय त्याचेकडे गोंडपिपरी येथील देखिल गोडाऊनचा अतिरिक्त कार्यभार होता.बेरडी नाल्याच्या पाण्यात ती कार काल वाहून गेली होती .या दुदैवी घटनेतील ती कार एक किलोमिटर अंतरावर शुक्रवारला मिळाली होती.उशिरा पर्यंत शोध पथकाची शोध मोहीम जारी होती .आज शनिवारला त्याचा मृतदेह मिळाला.अमितला एक पाच वर्षीय मुलगी , दुसरी दीड वर्षिय मुलगी ,व पत्नी अंजली आहे.या घटनेमुळे गेडाम परिवारात शोककळा पसरली आहे.काल दिवसभर जिल्ह्यातील महसूल विभागासह अन्य शासकीय विभागात या घटनेची चर्चा ऐकावयास मिळत होती. पस्तीस वर्षीय अमित हा अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभावाचा एक महसूल कर्मचारी होता .अमितचे वडील पोलिस विभागात कार्यरत होते.ते काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.