ताज्या घडामोडी

कामगार कल्याणच्या लोकनृत्य स्पर्धेत उर्जानगरच्या संघाने बाजी मारली !

स्री शक्ती महिला आघाडीच्या टीमने ही स्पर्धेत भाग घेतला!

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे नुकतीच गटस्तर लोकनृत्य स्पर्धा थाटात पार पडली .ही स्पर्धा मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व नागपूरचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.सदरहु आयोजित स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षिका मंगलाताई वैरागडे यांचे शुभहस्ते पार पडले .या वेळी कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे ,निल बिनकर ,कमल वर्मा , भुवनेश्वरी गोपनवार आदीं उपस्थित होते.पार पडलेल्या स्पर्धेत वर्धा, गडचिरोली,व चंद्रपूर जिल्ह्यातील संघाने भाग घेतला .या तिन्ही जिल्ह्यांमधुन एकूण आठ संघाने आपला स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. दरम्यान चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या स्री शक्ती महिला आघाडी संघाने प्रथमच भाग घेवून लक्षवेधक नृत्य सादर करून उपस्थित रसिक मंडळींचे लक्ष वेधले .या स्पर्धेत उर्जानगरचा संघ प्रथम ठरला . वर्धा संघ व्दितीय तर तृतीय क्रमांक गडचिरोली संघाने पटकाविला . स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पुनम झा.कथ्थक यांनी विभुषित केले होते.तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव अडबाले उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून राबविण्यांत येणा-या विविध उपक्रमांची माहिती सविस्तरपणे दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश इटनकर,किरण उपरे ,छाया गिरटकर ,दौलत गोरे ,समिक्षा सुरुटकर,शैला टोंगे,सविता वरखेडकर, वंदना खोब्रागडे,मोहना खोब्रागडे, ज्योति दामोधरे , कविता कांबळे ,करण थूल ,रोहीत गुप्ता यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close