ताज्या घडामोडी

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेवून दिव्यांग बहुउद्देशिय संस्थाने दिले त्यांना विविध मागण्यांचे एक निवेदन!

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

संपूर्ण शासकीय विभागात सुरु असलेल्या ठेकेदारी कर्मचारी भरतीत दिव्यांगांना स्थान देण्यात यावे ,दिव्यां यज्ञग्यांना रोजगार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ,एसडीओ कार्यालय ,तहसील कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय तथा पंचायत समितीच्या परिसरात १०बाय १०ची जागा उपलब्ध करून द्यावी ,दिव्यांग्यांसाठी दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी ,दिव्यांग्यांना भेटण्यासाठी शासकीय कार्यालयात वेळ देण्यात यावा, या शिवाय दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा कार्यालयात येण्या जाण्या साठी रेलिंग रॅमची व्यवस्था करण्यात यावी,तसेच तहसील कार्यालय व एसडीओ कार्यालय परिसरात झपाट्याने वाढत चाललेल्या विना परवाना असणां-या दस्तलेखकांना कार्यालयाच्या परिसरातून त्वरित हटविण्यात यावे आदीं मागण्यांचे एक निवेदन आज बुधवार दि.१६नोव्हेंबरला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना शहरातील दिव्यांग मित्र बहुउद्देशिय संस्था यांचे वतीने एक लेखी निवेदन सादर करुन शिष्टमंडळाने या मागण्या संदर्भात त्यांचेशी चर्चा केली.या वेळी या शिष्टमंडळात प्रामुख्याने दिव्यांग मित्र बहुउद्देशिय संस्था चंद्रपूरचे संस्थापक तथा अध्यक्ष दिलीप मिश्रा, सुधिर खोब्रागडे,संतोष जोंधळे,राजेश यादव,संजू गौंड ,विद्या डारला, महेन्द्र शेरकी,कलाबाई पेटकुले व अन्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.दरम्यान मंगळवार दि.१५नोव्हेंबरला येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम.यांची याच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून त्यांना देखील एसडीओ व तहसील कार्यालय स्तरावरील मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले होते.आपल्या स्तरावरील मागण्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी भेटीला गेलेल्या एका शिष्टमंडळाला दिले .या अगोदर सुध्दा याच संस्थेने तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व एसडीओ रोहन घुगे यांना लेखी निवेदन देवून या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले होते .परंतु त्या मागण्यांची परिपुर्तता न झाल्यामुळे परत आज नव्याने आलेल्या जिल्हाधिका-यांची भेट घेत त्यांचेशी मागण्यां संदर्भात चर्चा केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close