अळी मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
चिमुर तालुक्यातील अमरपुरी ( भान्सुली ) गावातील शेतामध्ये धान पिक उध्वस्त झाला आहे आधीच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे हाती येनारे पिक जाणार की काय अशी भिती शेतकऱ्यांना लागली आहे. अमरपुरी ( भान्सुली ) परिसरात धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते यावर्षी चांगले पिक आले परंतु काही शेतकऱ्यांच्या पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाली त्यातच घाटे अळी धान पिकाला लागल्या मुळे मंजुबाई मेश्राम यांचे सर्व पिक कोरपल्या गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधे चिंता पसरली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाला घाटे अळी लागल्या मुळे पिकाचे खुप नुकसान झाले आहे. म्हणुन अमरपुरी भांन्सुली मधील शेतकऱ्यांच्या पिकांची पहाणी करुन शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे .