ताज्या घडामोडी
जिद्द आणि चिकाटी च्या बळावर सक्षम ची नवोदय विद्यालय वर्ग सहावी साठी निवड
सर्व स्तरातून सक्षम वर कौतुकांचा वर्षाव
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीद्वारे 20 जानेवारी 2024 ला नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सक्षम खोब्रागडे यांनी सुईएस प्राप्त केले.
चिमूर तालुक्यातील काजळसर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सक्षम विकास खोब्रागडे यांची सत्र 2024 -2025 यासाठी पी. एम. जवाहर नवोदय विद्यालय तळोधी(बा.) येथे वर्ग सहावीसाठी निवड झालेली आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना दिले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.