गीत गायन स्पर्धेत खडाळा शाळेचे घवघवीत यश

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित गीत गायन स्पर्धेत इयत्ता पाचवीतील ओमकार निवृत्ती सूर्यवंशी याची प्राथमिक गटातून तालुकास्तरावर निवड झालेली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळास्तर,केंद्रस्तर, तालुकास्तर जिल्हास्तर अशी गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात येते यात ओंकार निवृत्ती सूर्यवंशी यांची तालुकास्तरावर निवड झालेली आहे आहे त्याच्या या यशाबद्दल केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के खडाळा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे पदवीधर शिक्षक व्यंकटराव जाधव, कैलास सुरवसे ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर साखरे, पांडुरंग मोरे,प्रल्हाद राठोड,वर्षा पाटील आणि राहुल काऊतकर यांनी अभिनंदन केलेले आहे ओमकार निवृत्ती सूर्यवंशी याच्या यशाबद्दल केंद्र स्तरातून व गावकऱ्यातून त्याचे कौतुक होत आहे.