ताज्या घडामोडी

अभ्यासात सातत्य असेल तर यश हमखास मिळते

बाजार समीती सभापती अनिलराव नखाते यांचे प्रतिपादन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी येथे दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार समारंभ.

शालेय आणि महाविद्यालय स्तरावरील शिक्षण हीच विद्यार्थ्यांच्या भविष्यातील खरी पायाभरणी असते.अभ्यासक्रमात सातत्य असेल तर विद्यार्थ्यांना यश हमखास मिळते असे प्रतिपादन वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी केले.
पाथरी येथील शिवाजीनगर मध्ये शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ६ जुन रोजी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात अध्यक्षीय समारोप करतांना अनिलराव नखाते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे उपसभापती शाम धर्मे, नारायणराव आढाव,बाजार समीती संचालक विष्णू काळे, गणेश दुगाने, रामप्रसाद कोल्हे, अशोक आरबाड,संजीव सत्वधर ,आनंद धनले, सय्यद गालेब, अमोल बांगड, शेख दस्तगीर, खाजगी शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश रोकडे उपाध्यक्ष विष्णू भिसे , सहसचिव रामेश्वर थोरे, राधाकिशन कणसे मुख्याध्यापक एन.ई.यादव प्राचार्य के. एन. डहाळे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी बोलतांना अनिलराव नखाते म्हणाले की,मेडिकल, इंजिनिअरिंग, आयटी अशा विविध क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता त्यामध्ये पात्र होण्यासाठी जिद्द आणि परिश्रम हेच महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले या शिवाय या शाळेत स्कॉलरशिप,ओलंपियाड, नवोदय अशा स्पर्धा परीक्षेची तयारी उत्तमरीत्या घेतली जात असल्याने भविष्यात याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल परिणामी दहावी व बारावी निकालाची परंपरा कायम राखली जात आहे असे प्रतिपादन नखाते यांनी केले.
विद्यार्थी प्रतिनीधी म्हणून प्राप्ती देशमुख , विद्या नवले तर पालक प्रतिनिधी म्हणून दगडोबा सोळंके, बाळासाहेब कासट यांनी मनोगत व्यक्त केले तर मान्यवरांमधून बाजार समितीचे संचालक आनंदराव धनले,अमोल बांगड ,रामप्रसाद कोल्हे, माजी संचालक नारायणराव यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्राचार्य के.एन.डहाळे यांनी केले.तर सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी प्रा. बालासाहेब गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
मान्यवरांच्या हस्ते या गुवंताचा केला सत्कार.
या शाळेचा दहावी परिक्षेचा निकाल ९४.९२ टक्के तर बारावी परिक्षेचा निकाल ९१.२६ टक्के असा लागला असुन निकाल परंपरा कायम राखली आहे.विद्यालयातील चैत्राली प्रदीप नवघरे(९९.२० टक्के) कुमारी भक्ती नंदू चट्टे (९९टक्के) गुण घेऊन पाथरी तालुक्यातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला तर १० वी व १२ वीतील १२० विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाल,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पाथरी शिवाजीनगर येथे शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात दहावी परिक्षेत ९९.२० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आलेल्या चैत्राली प्रदिप नवघरे हिचा पालकासमवेत सभापती अनिलराव नखाते यांचे हस्ते सत्कार केला याप्रसंगी उपसभापती शाम धर्मे, नारायणराव आढाव,विष्णू काळे, गणेश दुगाने, रामप्रसाद कोल्हे,अशोक आरबाड, संजीव सत्वधर ,आनंद धनले, सय्यद गालेब, अमोल बांगड, शेख दस्तगीर आदी उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close