भाजप केंद्रसरकरच्या दडपशाहीचा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध

तहसीलदार श्रीमती सुमन मोरे यांना निवेदन.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 16/06/2022 रोजी पाथरी येथे दिनांक 14/06/2022 रोजी श्री क्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिर यांच्या तर्फे मा.नरेंद्रजी मोदीजीच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात मा.उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना भाषण करण्यासाठी दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयाने अनुमती नाकारली त्या मुळे भाजपच्या केंद्रसरकरच्या सदर दडपशाहीचा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करून तहसीलदार श्रीमती सुमन मोरे यांना निवेदन देतांना,सौ.भावनाताई नखाते अध्यक्षा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,मीराताई सरोदे विधानसभा अध्यक्षा पाथरी,रेखाताई मनेरे शहराध्यक्षा महिला रा.काँ.,विष्णू काळे तालुका अध्यक्ष रा. यु.काँ.,अमोल भाले पाटील तालुका अध्यक्ष रा.वि.काँ.,खालेद शेख शहराध्यक्ष रा.काँ.आशपाख खान,सीताताई घाटूळ, रेणुकाताई सावळे,विमलताई नखाते,आशाताई नखाते व महिला दिसत आहेत.