ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्यात खांडला येथील तरुण शेतकरी ठार

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा वनपरिसरात कक्ष क्र 563 मधील सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील तरुण शेतकरी आपली स्वतःचे गुरे गावाच्या शेती व जंगल परिसरात गुरे चरायला नेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने आज खांडला ता सिंदेवाही येथील अनिल पांडुरंग सोनूले वय 36 वर्षे याला जागीच ठार केले सदर घटना पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा या गावच्या कक्ष क्रं 563 मधील घटना आहे, दुपारी 3.30 वाजता ची घटना असून सदर प्रेत शवविच्छेदन करण्याकरिता सिंदेवाही येथे नेले आहे, घटनेची माहिती होताच घटनास्थळी वनपाल किलनाके, ठाकरे मॅडम पिपर्डा, दांडेकर वनरक्षक, व वनमजुर उपस्थित झाले पुढील तपास सुरु आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close