ताज्या घडामोडी

विदर्भातील ग्रामीण रस्त्याच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा – डॉ हेमंत ईसनकर शेतकरी संघटनेचे नेते

मुख्य संपादक: कु.समिधा भैसारे

स्वतंत्राच्या काळापासून विदर्भातील ग्रामीण क्षेत्रातील अनेक गावातील ग्रामीण रस्त्यांचे विकास झाला नाही अजूनही गिट्टी मातीचे रस्ते अनेक गावांत आहेत तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी पांदण रस्त्याची योजना अंमलात आणली परंतु अनेक पांदण रस्ते शिव धुरे रस्ते यांचा विकास थांबला आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्राच्या रस्त्याचा विकास झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही असे मत डॉ हेमंत ईसनकर यांनी व्यक्त केले आहे तेव्हा शासनाने ग्रामीण रस्त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करावा करून द्यावा.
शासनाने ग्रामीण क्षेत्राच्या रस्त्यासाठी समृद्धी योजना एम आर जी एस योजना ,मातोश्री पांदण योजना , शिवधुरा योजना जी प फंडातील रस्ते विकास योजना अश्या अनेक योजना अंमलात आणल्या परंतु अनेक ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांचा विकास झाला नाही बरेच पांदण रस्ते हे जैसे थे आहेत तर काही रस्ते हे अर्धवट कामे करून थांबले आहेत तर काही धीम्या गतीने निधीमुळे सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जाण्यासाठी समस्या निर्माण होत असून अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक गावांत जाण्यासाठी रस्ते हे उध्वस्त झाले आहेत त्यामुळे शहरी भागाशी त्यांचा संपर्क तुटल्या सारखा झाला आहे गावातील अंतर्गत रस्तेसुद्धा खराब असून दुर्दशा झाली आहे अनेक शिवधूरे रस्ते बनायच्या प्रतीक्षेत आहेत यामुळे ग्रामीण क्षेत्राचा विकास खुंटला आहे यात ग्रामीण क्षेत्राचा व्यापार वाहतूक आरोग्य शिक्षण यावर विपरीत परिणाम होत आहे तेव्हा शासनाने ह्यासाठी लक्ष देऊन निधी उपलब्ध करुन विकास साधावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते डॉ हेमंत ईसनकर यांनी केली आहे.
केंद्रीय रस्ते अवजड वाहतूक मंत्री ना नितीन गडकरी म्हणतात की रस्त्याचा विकास झाला तर देशाचा विकास होणार त्यामुळे त्यांनी मुख्य मार्गांचा विकासा चा सपाटा चालवून शहराचा विकास साधला आहे परंतु ग्रामीण क्षेत्र हा अजूनही रस्त्याच्या संदर्भात मागासलेला आहे अजूनही विदर्भातील अनेक ग्रामिण क्षेत्राचा विकास थांबलेला आहे तेव्हा शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन ग्रामीण क्षेत्राच्या रस्त्याच्या पांदण रस्त्याच्या शिवधुरा रस्त्याच्या अंतर्गत रस्त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून विकास साधावा अशी मागणी डॉ हेमंत ईसनकर शेतकरी संघटनेचे नेते यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close