कासमपल्ली येथे व्हॉलीबाल सामन्याचे उद्घाटन
व्हॉलीबाल सामन्याचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष- सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुकातील व मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा- कासमपल्ली येथे भव्य व्हॅलीबाल समनेच्या उद्घाटन, माजी जि.प.अध्यक्ष- सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष- भाग्यश्री ताई आत्राम हे कासमपल्ली गावात आगमन होताच सर्व कासमपल्ली
गाववासीयांनी पारंपरिक पेन ढोल वाजवत भव्य स्वागत केलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष- श्री जोगाजी मडावी, गाव पाटील कासमपल्ली हे होते.
यावेळी उद्घाटनिय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांनी म्हणाले की, युकांनी क्रीडा क्षेत्रात आवड निर्माण केला पाहिजे. कारण क्रीडा मध्ये सुद्धा आपण आपले भविष्य घडवू शकतो. व सोबतच युवकांनी शिक्षणाकडे ही लक्ष दिलं पाहिजे. आजच काळात शिक्षणाशिवाय जीवन जगणे कठीण होणार आहे. म्हणून प्रत्येक पालकांनी आपले मुलांना शाळेत पेटवायला पाहिले.
तसेच या सर्व गोष्टींचा बरोबर आपला गावाचा विकास सुद्धा झाला पाहिजे. म्हणून आपले अहेरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम साहेब हे तुमचा गावाचा विकास करायला तयार आहे. कारण पेरमिलीत झालेल्या जनता दरबार मध्ये तुम्ही तुमचा गावातील समस्यांचा अर्ज दिले आहात ते सर्व समस्यांचा संबधित विभागाकडे माननीय आमदार साहेबांनी पत्रव्यवहार केलेले आहेत.
म्हणून मौजा- कासमपल्ली गावासह संपुर्ण मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सर्व गावातील नागरिक माननीय आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्याशी जुडून राहा.
आम्ही तुमचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहू.व तुमचे सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे मार्गदर्शनात म्हणाली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष- श्री लक्ष्मण येररावार, येरमणार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, मेडपल्ली चे ग्रा.पं.सदस्य सर्वश्री श्री बाजीराव तलांडी, श्री विलास वेलादी, कु. रंजना आत्राम, सौ. कमला पेंदाम, रोजगार सेवक श्री अनिल दुर्गे, वनरक्षक श्री मेडपल्लीवार साहेब, श्री विनोद मडावी- कोतवाल, कोरेल्ली बु. चे श्री सुनील दुर्गे, श्री बिच्यु गावडे,श्री पाटाडी पल्लो- गुर्जा बु., श्री बापु वेलादी, श्री हन्मंतु गावडे- वेडमपल्ली, श्री बाबुराव तलांडी, श्री दलसु आत्राम- तुमिरकसा, श्री तुकाराम वेलादी- मेडपल्ली, कासमपल्ली तेथील सर्व- श्री सीताराम तलांडी, श्री विलास वेलादी, श्री मनोज मडावी, श्री अविनाश वेलादी, राहून तलांडी, श्री तुकाराम इष्टाम, श्री यशवंत कोडापे, श्री पंकज मडावी, श्री एकनाथ इष्टाम, श्री साईनाथ वेलादी, श्री विलास मडावी व मौजा- कासमपल्ली गावातील महिला, पुरुषांसह संपूर्ण मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गतील नागरिक उपस्थित होते.