शिक्षण उज्वल भविष्यासाठी आवश्यक साधन – मौलाना हलीमउल्लाह कास्मी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शिक्षण आपल्या सर्वाच्या उज्जवल भविष्यासाठि एक आवश्यक साधन आहे असे प्रतिपादन जमिअत उलमाचे सचिव मौलाना हलीमउल्लाह कास्मी यांनी केले ते मानवत जमियत उलमा याच्या वतिने पेठ मोहल्ला मर्कज मज्जिद येथील दि.२७ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस हाफेज अयाज यांनी दिव्य कुराण चे पठण केले
यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थीत मौलाना हल्लिमुल्लाह कास्मी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. शिक्षणाचे हे साधन जीवनात वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सामाजिक आणि वैयक्तिकरित्या सर्वांसाठी महत्वाचा काळ आहे. मुस्लिम बांधवांनी विशेष म्हणजे शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच लग्नांमध्ये वाया खर्च न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न समारंभ करण्यात यावी असे ते म्हणाले.
यावेळी मुफ्ती महोम्मद ईसाक, मौलाना मिर्जा, कलिम बेग ,मौलाना सिराजोद्दिन नदवी,हाफेज इसा,मौलाना मोईन कास्मी,हाफेज ईसा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिर्जा कलिम बेग यांनी केले तर सुत्रसंचालन मौलाना अब्दुल रशिद यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन आयुब करिम बागवान यांनी केले होते कार्यक्रम ची सांगता प्रार्थना करुन झाली .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानवत येथील जमिअत उलेमा चे पदाधिकारी व युवकांनी परीश्रम घेतले.