ताज्या घडामोडी
अतिवृष्टीमुळे जिल्ह्याभरात 327 जनावरांचा मृत्यू
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गत आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्याभरात 327 जनावरांचा मृत्यू झाला असून अद्याप पर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही ही हा प्रश्न माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा कृषी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी पालकमंत्री नवाब मलिक साहेब यांच्या समोर निदर्शनास आणून दिला व याची तात्काळ पालकमंत्री साहेबानी दखल घेऊन जिल्हाधिकारी आचलजी गोयल यांना या सर्व शेतकरी बांधवाना मदत मिळाली पाहिजे असे आदेश दिले यावेळी आमदार बाबाजानी साहेब,माजी जि.प.अध्यक्ष राजेश दादा विटेकर,जि.प.उपाध्यक्ष अजयराव चौधरी आदी उपस्थित होते.