वाघाळा येथे मृत्युंजय श्री वाघेश्वर लिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे आज पासुन मृत्युंजय श्री वाघेश्वर लिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ जलयात्रा निघणार आहे. ८ ते १० दिंडी प्रदक्षिणा,१० ते ११ प्रायछश्र्चित्त विधी, ११ ते १२ गणपती पुजन,स्वस्तीपुण्याह वाचन,विविध मंडल देवता पुजन.दुपारी २ ते ३ जलाधिवास,३ ते ४ कुटीरहोम,४ ते ५ अग्निस्थापन,सायंकाळी ५ ते ६ सायंतन पुजन व आरती,६ ते ७ हरिपाठ,रात्री ८ ते १० ह भ प दिपक महाराज बादाडे यांचे हरिकिर्तन, रात्री १० ते १२ हरी जागर होणार आहे.
२ फेब्रुवारी रोजी ८ ते ९ स्थापित देवता पुजन,९ ते १० प्रासाद वास्तूशांती,१० ते ११ प्रधानहवन,११ते१२ तत्वन्यास होम स्नपनविधी, दुपारी २ ते ३ मुर्तीपती पुजन,३ ते ४ हवन, ४ ते ५ धान्यादिवास, सायंकाळी ५ ते ६ सायंतन पुजन व आरती,६ ते ७ हरिपाठ,रात्री ८ ते १० ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचे हरिकिर्तन,रात्री १० ते १२ हरिजागर.
तर शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ स्थापित देवता पुजन,८ ते ९ देवप्रबोधन व उत्तरतंत्र,९ ते १० प्राणप्रतिष्ठा,ध्वजप्रतिष्ठा- पुर्णाहुती- ब्राम्हण पुजन-प्रसादोत्सर्ग, १० ते १२ श्री ह भ प कृष्णाजी महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन,दुपारी १२ वाजता महाप्रसाद.
या कार्यक्रमाचे पौरोहित्य ग्रामाचार्य-वेद शास्र संपन्न श्री सुभाष देवा जोशी,कर्माचार्य- श्री ह भ प मिलिंदशास्त्री पाठक व त्र्यंबकेश्वर येथील सहकारी ब्रम्हवृंद करणार आहेत. या पुजेचे यजमान संतचरणरज शिवभक्त तथा गावचे सरपंच भागवत उर्फ बंटी तात्यासाहेब घुंबरे पाटील हे असणार आहेत. हा कार्यक्रम संपुर्ण वाघाळा गावच्या वतीने संपन्न होत असून श्री मृत्युंजय वाघेश्वर मंदिर परिसरात संपन्न होत आहे.