ताज्या घडामोडी

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत पटकावला राज्यातून तिसरा क्रमांक

शहर प्रतिनिधी : प्रमोद दुर्गे गोंडपिपरी

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी देवराव कोंदुजी शेडमाके यांनी पीक स्पर्धेत राज्यातून तिसरा क्रमांक पटकावल्याने त्यांनी केलेल्या आधुनिक शेतीची चर्चा सर्वत्र केली जात आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील देवराव कोंदुजी शेडमाके याच्याकडे कृषी पदविका नाही, तंत्र यंत्र यांची पुरेशी माहिती नाही ,
तरी सुद्धा एका हेक्ट्ररात तब्बल 41 क्विंटल हरबऱ्याचे पीक घेतले.
राज्य पातळीवरील रब्बी हंगाम पीक स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला! कधी ओला दुषकाळ, तर कधी सुखा दुष्काळ , नापिकी इत्यादींच्या कारणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाते.तर कधीनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसतो आहे.अशा स्थितीत शेतीची सर्व सूत्रे देवरावनेआपल्या हाती घेतली आधुनिक शेतीला प्राधान्य दिले त्यासोबत कृषी विभागाचे मार्गदर्शन घेणे सुरू केले सिंचनाच्या व्यवस्थेसाठी शेतात विहीर खोदली, तुषार सिंचन लावने,शेणखताचा वापर करून एका हेक्‍टरमध्ये 41 क्विंटल हरभरा पीकवल्याने पीक स्पर्धेत राज्यातून तिसरा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई मध्ये होणाऱ्या सोहळ्यात बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी आज दिली आहे .
शेती हा देवरावाचा आवडता विषय असून,
पिके घेताना नवनवे प्रयोग तो करीत असतो कृषी विभागांमुळे आधुनिक शेती कळली आहे. मला मिळालेल्या यशात माझा परिवार आणि कृषी विभागाचा मोलाचा वाटा आहे असे देवराव शेडमाके यांनी आज सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close