ताज्या घडामोडी

चांगले आचार,विचार,आणि संस्कार भागवत सप्ताहाच्या माध्यमातून साध्य केल्या जाते खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

वारकरी सांप्रदाय तथा बहुउद्देशीय विकास संस्था, मुरखळा (माल)अखंड हरिनाम ज्ञानदान श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चामोर्शी तालुक्यातील मौजा – मुरखळा( माल) येथे वारकरी सांप्रदाय तथा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या जयंतीच्या पावन पर्वावर श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व संत तुकाराम महाराज चरित्र कार्यक्रम तिथी द्वारा आयोजित भागवत प्रवचनकार ह.भ.प.धनराज महाराज नागापूरे यांच्या वाणीतून अखंड हरिनाम ज्ञानदान श्रीमद् भागवत सप्ताहाचे चे आयोजन करण्यात आले होते.

या भागवत सप्ताह कार्यक्रमा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी भाविक भक्तांना मार्गदर्शन करतांना आजच्या काळात भारतीय संस्कृतीचे जतन करून भारतीय संस्कृतीची एकता टिकवण्यासाठी अशा भागवत सप्ताहाचे आयोजन करणे गरजेचे आहे.अशा या भागवत सप्ताहामुळे चांगले आचार, विचार, संस्कार निर्माण होतात. याबरोबरच राग,द्वेष, लोभ,मत्सर, वाईट विचार यावर जर मात करायचे असेल तर अशा धार्मिक कार्यक्रमाची आज गरज आहे.या माध्यमातून चांगले विचारधारा आत्मचिंतन,आध्यात्मिकता कृतीत आणावे व त्याचे अनुकरण करावे.वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचाराबरोबरचं थोर महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजे,
तुकडोजी महाराजांनी एका अभंगात म्हटलं माणूस द्या !मज माणूस द्या ! माणसानी माणसासारखं वागलं पाहिजेत, माणसाने माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे.असे मत खासदार अशोक नेते यांनी या भागवत सप्ताह कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन केले.

यावेळी गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सुद्धा भाविक भक्तांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

याप्रसंगी भागवत आयोजक मंडळानी मान.खासदार अशोकजी नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,तसेच लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे यांचे शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मानसन्माने स्वागत केले.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे यांनी वारकरी संप्रदायतील बालगोपालांसाठी टाळ मंजिरा भेट दिली.
बालगोपालांनी आईचा जोगवा,जोगवा या गाण्यावर अतिशय सुंदर आकर्षक नृत्य सादर केलं.

याप्रसंगी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, विधानसभा विस्तारक दामोदर अरिगेला,भाजपा युवा नेते तथा मुरखळा माल चे सरपंच भास्कर बुरे,शेषराव कोहळे,तसेच मोठया संख्येने भाविक भक्त महिला बंधुभगिनी, युवक वर्ग , बालगोपाल उपस्थितीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close