चंद्रपूर तहसिल कार्यालयात महाराष्ट्र दिना निमित्त आ.किशोर जोरगेवारांचे हस्ते ध्वजारोहण
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
1 मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथील तहसील कार्यालयात सकाळी 7 वाजता चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभारी तहसिलदार डॉ.जितेंद्र गादेवार, नायब तहसीलदार राजू धांडे, दिलीप गोडसेलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर येथील तहसील कार्यालयातही महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तहसिल कार्यालयातील ध्वजारोहन होताच उपस्थितांनी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गायले. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाच्या प्रत्येक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीन सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही महाराष्टाने योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे यावेळी जोरगेवार म्हणाले. या ध्वजारोहण कार्यक्रमला तहसील कार्यालयातील शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांची मोठ्या यंख्येने उपस्थिती लाभली होती.