उज्वला नागोसेंचा व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या वतीने सत्कार
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डातील मूळ रहिवाशी उज्वला गिरीधर नागोसे -तराळे यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल बुधवार दि.६सप्टेंबरला संध्याकाळी सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असणा-या भद्रावतीच्या व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उज्वला नागोसे -तराळे यांना गोंडवाना विद्यापीठा तर्फे अर्थशास्त्र या विषयात आचार्य पदवी नुकतीच बहाल करण्यात आली आहे.व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष कु. किरण विजय साळवी यांनी भद्रावती नगरीत त्यांच्या या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाला किरण साळवी ,संस्थेच्या कलावती कोडापे यांच्यासह कल्याणी कांबळे, माया उईके प्रामुख्याने उपस्थित होत्या.उज्वला नागोसे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.आयोजित या छोट्याखानी कार्यक्रमाला मुक्ता तराळे, रुपाली लांडगे, वनिता तराळे, मयुरी तराळे, इशिका तराळे, मेघावी तराळे, सीमा तराळे, मेघा तराळे, कियांश तराळे, या शिवाय नागोसे तराळे कुटुंबातील सदस्य, सासरे (पांडुरंग तराळे),सासु (अनुराधा तराळे )पती (युवराज तराळे) आदिं उपस्थित होते.
उज्वला नागोसे ह्या एक सर्वसाधारण गृहिणी असून त्यांना शिक्षणाची अमाप आवड आहे. शिक्षणाच्या या गोडीमुळेच त्यांनी ही पदवी संपादन केली.वेळोवेळी त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रोत्साहन मिळाले आहे.
उज्वला नागोसे यांनी ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषीविषयक विचार, भूमिका व योगदान’ या विषयावर गोंडवाना विद्यापीठाला आपला शोध प्रबंध सादर केला होता.
त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे मार्गदर्शक खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जे.एम .काकडे व डॉ शैलेंद्र देव ,आई, वडील, पती, सासू, सासरे यांना दिले आहे.विशेष म्हणजे उज्वला नागोसे -तराळे यांच्या सासऱ्यांचा 69 वा वाढदिवस काल होता .त्या निमित्ताने त्यांना ही वाढदिवसाच्या शुभेच्छा या प्रसंगी देण्यात आल्या कालच्या या सत्कार सोहळ्यात उज्वलाने आपले विचार व्यक्त करताना व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या विशेष उल्लेखनीय कार्यांचा उल्लेख करीत त्यांनी किरण साळवी यांचे तोंडभरून कौतुक केले.