बेंबाळ येथे कोवीड लसीकरण केंद्र सुरू
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या विषाणूची लागण लहान बालकापासून ते वयोवृद्ध पर्यंत होत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जनता चांगलीच धास्तावली आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. मूल तालुक्यातील बेंबाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळच्या वतीने जिल्हा परिषद शाळा बेंबाळ येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटक 4 एप्रिल 2021 ला सकाळी 11 वाजता करण्यात आले श्री चंदूभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल यांचे हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले व श्री चंदूभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल यांना कोवीड लसीचा पहिला डोस देण्यात आला. परिसरातील 45 वर्षावरील नागरिकांनी या लसीकरनाचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. करुणा उराडे सरपंच ग्रामपंचायत बेंबाळ उपस्थित होत्या. यावेळी मा. मुन्ना कोटांगले उपसरपंच ग्रामपंचायत बेंबाळ, गुरुदास राऊत तंटामुक्ती अध्यक्ष बेंबाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन धोंगडे डॉ. जतीन लेनगुरे डॉ. रंगारी मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.