नेरी महावितरण कंपनीचे वार्ड क्र. ३ मधील खांबाच्या लोंबकळलेल्या तारांकडे दुर्लक्ष
वारंवार निवेदन अर्ज देऊनही नेरी महावितरण कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष.
टेंशन राड दुरस्तीसाठी महावितरण कर्मचारी करतात पैशाची मागणी.
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
गेल्या काही वर्षापासुन नेरी येथील वार्ड क्र. ३ मधील पोपटे गुरुजी ते बाळु सोंडवले यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या इलेक्टीक लाईन च्या तारा खाली लोंबकळत आहेत याची तक्रार तोंडी व लेखी देऊन सुद्धा नेरी महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे.
इलेक्ट्रीक पोल क्र. ४९ ते पोपटे गुरुजींच्या घराजवळील रस्त्यापर्यंत असणाऱ्या इलेक्ट्रीक लाईनचे तार पुर्णता टेंशन राड तुटल्याने सहा वर्षापासुन खाली आलेले आहेत त्यामुळे जिवीत हानी होण्याची शक्यता निर्मान झाली आहे व खाली आलेल्या तारामुळे शार्टसर्किट होऊन घरांना आग लागण्याची भिती आहे. त्यामुळे वार्डातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोणतीही अनुचीत घटना घडल्यास त्याला पुर्णताहा नेरी महावितरण कार्यालय व संबधीत लाइनमेन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन ३० /४ / २२ ला वार्डातील नागरिक राजेराम कामडी , नागनाथ फुलझेले माजी जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो , अरविंद नगराळे , दयाराम नगराळे व मिलिंद नगराळे यांनी पालकमंत्री विजयभाऊ वडट्टीवार , आमदार बंटीभाऊ भांगडिया , कार्यकारी अभियंता चिमुर , ठाणेदार पोलीस स्टेशन चिमुर , सरपंच ग्रा.प. नेरी , तमुस अध्यक्ष नेरी यांना दिले आहे
टेंशन राड दुरुस्ती करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी पैशाची मागणी करतात अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी निवेदन देऊन सात दिवस होऊन ही अजुन पर्यंत कोनतीही कार्यवाही झाली नाही तरी नेरी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून टेंशन राड लाऊन देण्यात यावा अशी मागणी वार्डातील नागरिकांनी केली आहे.