ताज्या घडामोडी

करकोचा पक्ष्याला जीवनदान पर्यावरण संवर्धन समिती कडुन पक्ष्याला जीवनदान

:::: आजारी पक्ष्याला वनविभागाकडे सुपुर्द

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

नेरी–:: पक्षी पर्यावरणाचा मौल्यवान घटक आहे.पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . पक्षी आता मात्र दिसेनासे होत आहे. पक्ष्यांची शिकार, अपघात, वातावरण बदल, वृक्ष तोड,वनवा आदी कारणाने पक्ष्यांचा निवारा हरवला आहे.चिमुर तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांच्या शेतात करकोचा पक्षी आजारी अवस्थेत शुभंम पिसे व तुशांत पिसे यांना पडुन दिसला. दोघांनीही वेळ न लावता पक्षी प्रेमी कवडू लोहकरे यांच्या शी संपर्क केला. नेरी येथील वनविभागामध्ये रात्रीच्या वेळेस कोणीच नसल्याने चिमुर वनविभागामध्ये आजारी पक्ष्याला आणण्यात आले. पक्षी काहीच खाल्ले नसल्याने पुर्णत: कमजोर पडला होता.पक्ष्याला उडता ये़इना पक्षी प्रेमी कवडू लोहकरे यांनी पक्ष्यांसाठी खाद्य म्हणुन मासे व पाणी देण्यात आले. व वनविभागाकडे सुपुर्द करण्यात आले.यावेळी पक्षी प्रेमी कवडू लोहकरे, शुभंम पिसे, तुशांत पिसे व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

“” नेरी परीसरात तलावावर जाळे टाकून पक्ष्यांशी शिकार करण्याची टोळी सक्रिय आहे. करकोचा, बगळा इतर पक्षी संकटात सापडले आहे. शिकार करणा-या शिका-यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी””

कवडू लोहकरे
पक्षी मित्र चिमुर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close