ताज्या घडामोडी

पुरावा नसतांना आमदार दुर्राणी यांची बदनामी करणाऱ्या लोकशाही न्युज चँंलवर कारवाई करा

पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन .

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कुठलाच पुरावा नसताना पाथरी शहरातील काही प्रश्नांवर चुकीचे समज पसरवून ३ दिवसापासुन लोकशाही न्युज चँंनलवर निराधार वृत्त दाखवत आमदार बाबाजाणी दुर्राणी यांची बदनामी केली आहे या प्रकरणी लोकशाही न्युज चँनलवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सोमवारी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की,पाथरी मतदारसंघाच्या विकासात महत्वाचे योगदान असलेल्या आमदार बाबाजाणी दुर्राणी व तात्कालिन नगराध्यक्ष जुनेद दुर्राणी यांच्या राजकीय कारकीर्दीतील अस्तित्वाविरुद्ध एक प्रकारे या लोकशाही न्युज चँनलने षडयंत्र रचण्याचा हा प्रकार केल्याने या वृत्त वाहिनीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे म्हटले आहे. याशिवाय पाथरी शहरात दिवाळीपूर्वी व्यापाऱ्यांसाठी व आडत्यांसाठी बाजारपेठेत गाळे उभारून नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना ठराविक रक्कम भरून गाळे देण्याचा निर्णयही घेतलेला आहे.हे खऱ्या वास्तवाला बगल देत चुकीची माहिती प्रसारित का केली जाते..? तसेच पंचायत समिती जागेमध्ये सुध्दा आ.बाबाजाणी दुर्राणी यांचा कोणता वैयक्तिक सहभाग नाही. मुळात स्मशानभूमीच्या जागेवर पंचायत समिती बांधलेली नाही पंचायत समिती ईमारत आधीपासूनच तेथे आहे.परंतू लोकशाही न्युज चँनलने हे चुकीचे प्रसारण का केले.याबाबत तातडीने चौकशी करून कारवाई झाली पाहिजे असे या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर अनिलराव नखाते,विष्णु काळे,शेख खालेद, सुभाष कोल्हे,नारायण आढाव,चक्रधर उगले, हन्नान खान दुर्राणी, अलोक चौधरी,राजू पामे,हकीम अन्सारी, अहेमद आतार,नितेश भोरे,माणिक गायकवाड, संदीप टेंगसे, कृष्णा कांबळे ,आमोल भाले,गोवीद हारकळ, प्रा.मलीक पटेल,असीफोदीन अन्सारी, राजेश नवले ,अनिल कोल्हे,रामेश्वर कोल्हे,आबेद खाँ पठाण, शेख मुनीर,शेख इरफान,मोईन मास्टर, राहुल ब्रम्हराक्षे, प्रविण निसरगंध,सागर निसरगंध,सोपान कोल्हे ,यासीन खाँ पठान,शेख मुस्तफा आदींच्या सह्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close