भैय्याजी प्रतिष्ठान आयोजित -माता रमाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सयुक्त जयंती निमित्त – प्रबोधनात्मक भिमगीत संगीत रजनी परभणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी भैय्याजी प्रतिष्ठान तर्फे (पर्व २ रे )आयोजित अजिंठा नगर येथे माता रमाई व छ.शिवाजी महाराज यांच्या सयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री. व्यंकटभाऊ शिंदे हे होते तर ,उदघाटक – मा. प्रतापभैय्या देशमुख (माजी महापाैर )- प्रमुख उपस्थिती समाज कल्याण व न्याय मंत्री मा. ना. धनजंय मुंढे साहेब हे होते, धनंजय मुंडे साहेबाच्या हस्ते महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज , माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी धम्मदिप रोडे आणी व्यंकटराव शिंदे यांनी समाजकल्यान मंत्री धनजंय मुंढे आणी प्रतापभैय्या देशमुख यांचा सत्कार केला , यावेळी गवळणआई रामचंद्र रोडे (बांधकाम सभापती परभणी शहर महानगर पालिका)धम्मदिक्षा महिला मंडळ, धम्मज्योती महिला मंडळ, नगरसेवक नईम इनामदार, नगरसेवक फहाद भाई,गौतम निवडंगे, ज्योतीताई बगाटे, प्रियंका उबाळे, नासेर भाई शेख,कागदे मामा, बाळासाहेब गोडबोले, सुधीर साळवे, सुभाष जोंधळे, प्रशांत कागदे,संजय वाघमारे, राहुल
धबाले, रमेश घनसावंत, लखन जामकर,रेखा आवटे, आदी मान्यवर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षन (काळजावर कोरलय नाव भिमा कोरेगाव फेम) अजय देहाडे ,झी युवा फेम शुभम मस्के परभणी यांच्या भीमगीताचा बहारदार कार्यक्रम अजिंठा नगर परभणी येथे मोठया हर्ष उल्लासात संपन्न झाले. मागील दोन वर्षांपासून कोणताही कार्यक्रम न झाल्या मुळे भिमगीत रजनी चा कार्यक्रम जल्लोषात पार पडला यावेळीअजय देहाडे यांच्या काळजावर कोरल नाव भिमाकोरेगाव या गीताने उपस्थिताची मने जिकंली तर शुभम मस्के यांची ही एकापेक्षा एक भिमाची गाने गावुन उपस्थिताची मने जिंकली . यावेळी अनेक मान्यवर उपस्थितीत होते व अजिंठा नगरच्या असंख्य महिला व पुरष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक – प्रास्ताविक धम्मदिप रोडे यांनी केले तर सुत्र संचलन . संजय बगाटे यांनी केले . तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी का.अमरदिप भैय्या रोडे मित्रमंडळ व भैय्याजी प्रतिष्ठानचे यांनी प्रयत्न केले.