ताज्या घडामोडी

तफोभूमी गोंदेडा येथे विदर्भ पटवारी संघ चंद्रपुर जिल्हाची वार्षिक आमसभा संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी: रामचंद्र कामडी नेरी

विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा चंद्रपुर ची वार्षिक आमसभा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह गोंदेडा ता चिमूर या ठिकाणी विदर्भ पटवाळी संघाचे जिल्हाअद्यक्ष प्रकाश सुर्वे यांच्या अद्यक्षतेखाली संपन्न संपन्न झाली या वेळी केंद्रीय अद्यक्ष बाळकृष्ण गाढवे,केद्रीय सरचिटणीस विदर्भ पटवाळी संघ संजय अनव्हाने,केंद्रीय सहसचिव हरिहरजी निंमकडे,चंद्रपुर जिल्हा शाखा सचिव सपंत कन्नके यांच्या उपस्थितीत मध्ये आमसभेला सुरवात करण्यात आली,
सभेला मार्गदर्शन करताना केंद्रीय पटवाळी मंडळींनी पटवाळी संघटची गर्जव संघटना वाढीसाठी उपाययोजना ,जुनी पेशन मिळण्यासाठी सुद्धा संघटना मोठा लढा उभा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले,
चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा तफोभूमी मध्ये झालेल्या वार्षिक आमसभेत प्रकाश बाबुराव सुर्वे यांची चंद्रपुर जिल्ह्याच्या अद्यक्षपदी निवड करण्यात आली तर संपतराव कन्नके, सरचिटणीसपदी,विनोद गेडाम उपादयक्ष,दीपक गोहणे सहसचिव,वैभव कारलेकर यांची कोषादयक्ष अविरोध निवड करण्यात आली.या निवडीचे श्रेय त्यांनी विदर्भ पटवारी संघ नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे व केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाने व सर्व केंद्रीय पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तलाठी यांना दिले आहेत .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दामोदर लोणारे यांनी काम पाहिले.नवनियुक्त पदाधिकारी यांना केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाने यांनी शपथ दिली,आमसभेचे नियोजन उपविभागीय शाखा चिमूर च्या वतीने करण्यात आली होती ,संचालन संदीप आखरे,आभार प्रदर्शन प्रवीण ठोंबरे अद्यक्ष पटवाळी संघटना चिमूर,यांनी केले.
कार्यक्रम मध्ये प्रवीण ठोंबरे,अमोल घाटे,दिवाकर दुधकुरे,संदीप आखरे,बंडू दडमल,प्रणिता कामडी,कँनाके मॅडम,वैभव कारलेकर, रितेश आमटे,आकाश तरारे,अनिल वाघमारे,विनोद गजभे, विनोद रामटेके, प्रदीप पाटील तसेच उपविभागीय स्तरावरील संपूर्ण सभासदांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close