ताज्या घडामोडी

साले कसा येथे दंत व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दंत व शस्त्रक्रिया शिबिर ग्रामीण रुग्णालय, सालेकसा येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोज शनिवारी ला आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलताना नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,तंबाखू ,खर्रा खुटखा यामुळे अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात,मुख रोगाबरोबर कॅन्सर सुद्धा होतो.यासाठी दाताची काळजी घेत अनावश्यक धूम्रपान पूर्णपणे टाळावे, आपल्या मानवी अवयवांपैकी दंत हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे.रोज सकाळी दात स्वच्छ करावे. दाताची काळजी घ्यावी.या ठिकाणी आरोग्या विषयी स्टाल लावून अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला.मी अतिशय व्यस्त कार्यक्रमात असताना सुद्धा या दंत शिबिर कार्यक्रमाला आलो या निमित्ताने या दंत शिबिराला शुभेच्छा देतो तसेच नागरिकांनी या दंत व शस्त्रक्रिया शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.असे आवाहन करत या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खा.नेते यांनी प्रतिपादन केले.

“या शिबिरातील विशेष”
या दंत शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर /गोंदिया येथील नामांकित तज्ञ डॉक्टर कडुन तपासणी,रोगनिदान करून औषधोपचार निशुल्क व शस्त्रक्रिया तसेच आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यासाठी नोंदणी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बाबत नोंदणी,हे या शिबिरात आयोजित केले होते.

यावेळी मंचावर प्रामुख्याने या शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,भाजपा सालेकसा तालुकाध्यक्ष गुमानसिंग उपराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमित खोडनकर, वैदकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय सालेकसा डॉ.बि.डी.जायस्वाल, तसेच मोठ्या संख्येने आरोग्य अधिकारी कर्मचारी व गावातील बंधू व महिला भगिनीं कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close