भारतरत्न लतादीदींना श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
भारताच्या गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. या निमित्ताने येथील श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली.
श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज गीतांच्या माध्यमातून सुर्य, चंद्र, तारे असेपर्यंत टिकणारा आहे. लता दीदी च्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाच्या वतीने प्रार्थना केली.
यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने, तेजस महाजन, जगदीश साखरे, संस्थेचे सर्व सभासद तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, प्राचार्य डॉ महेश देशमुख , व्यापारी संघटनेचे सुरेंद्र रेदासनी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.