रविवारला होतेय बाबुपेठकरांचे जनआक्रोश आंदोलन !

प्रतिनिधी :रामचंद्र कामडी
मणिपूरमधील कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढली व त्यांचेवरती बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समाजमध्यमातून नुकतीच समोर आली आहे.हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असून
आता पर्यंत 140 लोकांनी आपला प्राण गमावला आहे. जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला असूनही तेथील राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकले नाही.या शिवाय चंद्रपूर नजिकच्या दुर्गापूर येथे एका मद्य विक्रेत्याने आपल्या दुकानातील शौचालयात भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संपूर्ण देशवासीयांची भावना दुःखवण्याचे काम केले आहे.

दोन्ही प्रकरणे गंभीर स्वरुपाची असल्याने बाबुपेठकर मित्र परिवाराच्या वतीने दोन्ही घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी उद्या रविवार दि. २३जूलैला दुपारी ठीक 03:00 वाजता राजाभाऊ खोब्रागडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यापासून ते नेताजी चौक , जूनोना चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन राजु कुडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.