ताज्या घडामोडी

५ किलोमीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक :-18 /12 /2022 रोजी वार रविवार पाथरी आष्टी रोड, नाथरा फाटा ते केदार वस्ती मार्गे कासापुरी फाटा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान केदार वस्ती आयोजित गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बॉक्स लंगडी तथा मॉंन्टेक्स बॉल असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष अजिंक्य भैय्या नखाते, उद्घाटक राजेश ढगे माझी सभापती पंचायत समिती, पाथरी, प्रमुख मार्गदर्शक विठ्ठल कांगणे संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी, परभणी तसेच व्यासपीठावर हीरक साहेब, शुभम कणसे, मंचक ढगे, लक्ष्मणराव ढगे, बापूराव मुंडे ,आश्रोबा केदार सरपंच केदार वस्ती, रामेश्वर ढगे पोलीस पाटील ,डॉक्टर मुरकुटे. आदी मान्यवर उपस्थित होते. बोलत असताना अजिंक्य भैय्या नखाते यांनी असे सांगितले की दरवर्षी याहीपेक्षा दर्जेदार स्पर्धा आपण घेऊ या वर्षी आपण दिलेल्या प्रतिसाद खूप छान आहे. सर्वांनी चांगल्या स्पर्धा पार पाडाव्या आणि आपले नंबर यावे यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावर्षी दहा बक्षीस ठेवण्यात आली आहेत. पुढच्या वर्षीपासून बक्षीसामध्ये वाढ करण्यात येईल व २०क्रमांक काढण्यात येतील.
ढगे साहेब आणि कांगणे सर यांनी खेळाडूंना करिअर विषयी मार्गदर्शन केले ते म्हणाले परिस्थिती सुधारायची असेल तर मनस्थिती सुधारली पाहिजे. यश मिळवण्यासाठी ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे. माणसाने ध्येयवेडे झाले पाहिजे वेडेच इतिहास घडवत असतात. करिअर विषयी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक आसिफ पठाण पारितोषिक ११ हजार रुपये प्रभाकरराव शिंदे यांच्यावतीने, ७०००रुपये व्दितीय क्रमांकसाठी अजिंक्य भैय्या नखाते यांच्यावतीने अंकुश हाके यास, तृतीय क्रमांकासाठी राजेभाऊ ढगे यांच्यावतीने ५हजार रुपये दयानंद चौधरी यास, चतुर्थ क्रमांक २ हजार रुपये प्राईस कमिटीच्या वतीने विष्णू लंबाळे, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस एक हजार रुपये गोविंद निमढगे यास कमिटीच्या वतीने पुढील पाच बक्षिसे कमिटीच्या वतीने रनिंग बूट देण्यात आले सहावा नंबर विशाल जाधव, सात नंबर गोविंद चट्टे, आठ नंबर उमाकांत ठोंबरे, नऊ नंबर अंगत कान्हेरे, आणि दहावा नंबर सुरेश इंगळे यांनी पटकावला वरील खेळाडूंचे बक्षीस वितरण स्पर्धा संपली त्या स्थळी लगेच करण्यात आली. या स्पर्धेत एकूण ३७५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता आज अतिशय उत्स्फूर्त वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा यशयश्वीतेसाठी पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे साहेब उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आर.एन.गिराम, श्रीमती घुगे, इनामदार, तुकाराम घांडगे,आय.बी.खान तसेच मॅरेथॉन कमिटी सदस्य राम केदार, शिवम केदार, सुरत चौरे, किरण तोंडे, बाबा चौरे ,दयानंद चौरे ,विशाल चौरे, धर्मराज चौरे ,अर्जुन चौरे ,नाना ठोंबरे, शंकर ढगे, आकाश तोंडे ,ऋषी तोंडे, सिद्धेश्वर चौरे, बाबासाहेब चौरे ,नितीन चौरे ,सुरेश चौरे ,दीपक मुंडे, विजय ठोंबरे ,आणि केदार वस्ती व परिसरातील सर्व नागरिकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी केले आणि राष्ट्रगीताने बक्षीस वितरण कार्यक्रमाची सांगता झाली आभार प्रदर्शन राम केदार यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close