श्री पद्धतीने धानाचे प्रात्याक्षीत
मलमपल्ली येथे धानाची श्री पद्धतीने रोवणी
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यातील मलमपल्ली येथील शेतकऱ्यांच्या शेतात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला अंतर्गत रेडी या कार्यक्रमाद्वारे केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थीने श्री पध्दतीने धानाची लागवड करण्याचे प्रात्याक्षिक सादर केले.
मलमपल्ली येथील शेतकरी बिंच्चंगा सिडाम, मीना सिडाम, अमर सिडाम , वैशाली सिडाम , जग्गनाथ मचकले यांच्या शेतात श्री पध्दतीने धानाची लागवड करण्यात आली या पध्दतीने तुडतुडा किडाचे व्यवस्थापन करुन योग्य उत्पादन घेता येते. याकरिता सेंद्रिय खतांचे हिरवळीच्या खतांचा व रासायनिक खतांचा वापर करावा या पध्दतीने रोवणी केल्यास सुर्यप्रकाश पोहचतो व शेतकऱ्यांना उत्पादन वाढ होते .
श्री पध्दतीचे फायदे ,खत ,रोग व कीड व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सुत्र समजून दिले
या प्रात्यक्षिकीकरणात कु. तेजस्वीनी रूडे या विद्यार्थ्यांने अत्याधुनिक रोवणी करण्यास सहभाग दिला.
यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.टी.सुरजे , रेडी या कार्यक्रमांचे प्रभारी श्री किशोर गहाणे , उपप्रभारी श्री तुषार भांडारकर , कृषीशास्त्र विभागाचे श्री आशिष वाढई ,कु. उषा गजभिये , कृषी कीटकशास्त्र विभागाचे श्री छबिल दुधबळे , श्री रूपेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले .
अहेरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात श्री पध्दतीने धानाची लागवड करण्यातबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सातत्याने या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे .