ताज्या घडामोडी
साऊथ एशियन कराटे स्पर्धेत नागपुरच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
नुकत्याच भुतान येथे झालेल्या साऊथ एशियन कराटे स्पर्धेत नागपुरच्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पदकांची कमाई केली त्यामुळे त्यांचे नागपुर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
यामध्ये काता प्रकारात १० ते ११ वयोगटात सुबोध भगत याने सुवर्ण पदक, ११ ते १२ वयोगटात अध्यश पौनिकर याने रजत पदक, १७ ते १८ या वयोगटात जेसन स्टॅनिसलस याने सुवर्ण पदक तर श्रृष्टी शिंदे हिने ब्ल्याक बेल्ट काता मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिहान शाम भोवते व आपल्या आई वडलांना दिले.