ताज्या घडामोडी

पारधी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार -खा. बाळुभाऊ धानोरकर

पारधी उत्थान कार्यक्रमांतर्गत विविध प्रमाणपत्राचे वाटप.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वनोवनी भटकणाऱ्या पारधी समाजाला त्यांचा मूलभूत हक्क अधिकार व योजना मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन उद्घाटक म्हणून लाभलेले चंद्रपूर वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खा, बाळूभाऊ धानोरकर यांनी पारधी उत्थान कार्यक्रमांमध्ये दि,३०/०१/२०२२ला चिनोरा (पारधी टोला) येथे केले.
या कार्यक्रमात वरोरा -भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे ,उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने, (सोळंके )वेकोलि माजरी एरियाचे महाप्रबंधक गुप्ता, बीडिओ संजय वानखेडे, नायब तहसीलदार मधुकर काळे, सरपंच ताई परचाके ,उपसरपंच वंदना ढेंगळे व मोठ्या संख्येने पारधी समाज बांधव उपस्थित होता. गेल्या ३१ मार्च व १ एप्रिल२०२२ला दोन दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,त्या दिवशी पारधी कुटुंबाचे अर्ज व कागदपत्रे मागविण्यात आले होते, त्याचेच फलित म्हणून आज दि, ३०/०४/२०२२ ला जात प्रमाणपत्र ,रेशन कार्ड ,आधार कार्ड ,मतदान ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र खा .बाळुभाऊ धानोरकर व आ,प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले ,कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक तहसीलदार रोशन मकवाने (सोळंके) म्हणाल्या की,पारधी बांधव अशिक्षित असल्याने त्यांना मूलभूत सुविधा व प्रमाणपत्र मिळविता येत नाही त्यामुळे तालुका प्रशासन त्यांना विनामूल्य प्रमाणपत्र देणार असल्याचे रोशन मकवाने यांनी सांगितले, एसडीओ सुभाष शिंदे यांनी महसूल प्रशासन पारधी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे बोलून दाखवले आ, प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या ज्या ज्या पारधी टोल्यावर सोयीसुविधा नाहीत त्या ठिकाणी पांदन रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे मत व्यक्त केले, तसेच जिल्ह्यातील समाजातील पहिली उच्चशिक्षित मुलगी दीक्षा राजू दडमल हीचा सत्कार आ, प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी धर्मेंद्र शेरकुरे हे बोलतांना म्हणाले समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही तसेच शिक्षण व अन्न वस्त्र, निवारा या पासून वंचित असल्याचे त्यांनी बोलून दाखविली कार्यक्रमांमध्ये आदिवासी पारधी समाजाला एकूण १८२ लोकांपैकी ५२ लोकांना जातप्रमाणपत्र सह विविध दाखले मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले, व उर्वरित प्रमाणपत्र व इतर दाखले काही दिवसात देण्यात येतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. बीडीओ संजय वानखडे यांचे सुद्धा योगदान कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत सचिव, सरपंच ,पोलीस पाटील, संघटनेच्या कार्यकर्त्यांचे योगदान लाभले तसेच सदर कार्येक्रमाला यशस्वी करण्याकरिता सुधाकर पवार, दिवाकर नन्नावरे , विकास पवार ,अमोल दडमल, जितेंद्र नन्नावरे, सुनील घोसरे, ढोके यांनी अथक परिश्रम केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close