ताज्या घडामोडी

मानवत शहरामध्ये अचानक आग लागुन गॅरेज जळूण खाक

दीड लाख रुपयांची आर्थिक नुकसान

प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

मानवत शहरातील आठवडी बाजार मध्ये असलेल्या अ.खालेक अ. बाबणजी कूरेशी यांच्या खालेक गॅरेज, सायकल दूरूस्ती केंद्राला अचानक लागलेल्या आगीत लाखोचे मोठे नूकसान झाले.
मानवत शहरातील रहिवाशी असलेले अब्दूल खालेक अब्दूल बाबणजी कूरेशी यांचे खालेक या नावाने नगर परिषदेच्या भाडेतत्वावर घेतलेल्या जागेमध्ये शहरातील मेनरोड वर स्वामी विवेकानंद चौकात खालेक गॅरेज, सायकल रिपेअरिंग, खरेदी,विक्री,व दूरूस्ती सेंटर गेल्या अनेक वर्षा पासून सूरू आहे.
काल रात्रीला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गॅरेज आगीच्या भक्ष स्थानी पडले त्या मूळे दूकानातील सुमारे दिड लाख रुपये चे साहित्य जळून खाक झाले.
आगीची घटनेची माहीती मिळताच पत्रकार संजय नाईक हे घटना स्थळावर हजर होऊन नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देऊन पाचारण केले. घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दलाचे जवान शेख कलीम , राम दहे,मुकेश कुमावत यांनी घटनास्थळी हजर होऊन आग आटोक्यात आणली, खालेक
गॅरेज परिसरातील त्या मूळे चाळीस दूकाने बाल बाल बचावली त्या मूळे शहरात मोठा अनर्थ टळला असला तरी शुन्यातून विश्व निर्माण करणारे अब्दूल खालेक अब्दूल बाबणजी कुरेशी यांचे मात्र या अकस्मीत लागलेल्या आगी मूळे मोठे अर्थिक नूकसान झाले आहे. आगीत
झालेल्या नूकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी नागरीकातून व्यक्त केल्या जात आहे.
मानवत पोलीस स्टेशन येथे अब्दुल खालिक बाबनजी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप मुरमुरे समीर पठाण हे तपास करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close