ताज्या घडामोडी
साईबाबा जन्मस्थान पाथरी मंदिरात दत्त जन्मोत्सव आनंदी वातावरणात साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
भगवान दत्तात्रेय जन्मोत्सवानिमित्त संतोष राव दिनकरराव चौधरी यांचे शुभ हस्ते भगवान दत्तात्रयांना महाभिषेक करण्यात आला पूजेचे पौरोहित्य राम गुरु शास्त्री पाथरी यांनी केले. यावेळी व्यवस्थापकीय विश्वस्त श्री साई स्मारक समिती पाथरी एडवोकेट अतुल दिनकरराव चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी प्रभाकर पाटील वगैरे साईभक्त उपस्थित होते
दत्तभक्तांना साईबाबांनी दत्ताच्या स्वरूपात दर्शन दिले होते. बरेचसे साई भक्त साईबाबांना दत्तावतार मानतात. साईबाबा त्यांच्या हयातीत शिर्डी येथील लेंडी बागेत दत्त मंदिरास नियमितपणे भेट देत असत.