ताज्या घडामोडी

उपचाराविना गेला तरूणाचा नाहक बळी नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

दोन वैद्यकीय अधिकारी तात्काळ सेवेतून निलंबित

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 ला संजय शिवाजी गराटे वय 35 वर्षे राहणार नेरी यांना सकाळी सात वाजता नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी भरती करण्यासाठी आणले असतात नेहमीप्रमाणेच प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे ड्रायव्हर व्यतिरिक्त एकही कर्मचारी उपचारासाठी उपस्थित नव्हते. तब्बल दीड ते दोन तास रुग्ण तसाच उपचाराविना तडफडत असल्यामुळे त्यांच्या आजारात वाढ होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र येथेच त्याचा नाहक बळी गेला. ही घटना घडल्यानंतर तंबल दीड ते दोन तास जबाबदार कर्मचारी उपस्थित झालेले नाही. ही बातमी नेरी मध्ये वाऱ्यासारखी पसरून गावातील सर्व नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे धाव घेतली. गावातील सर्व नागरिकांनी जोपर्यंत संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे परीस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संबंधित पोलिस विभागाला पाचारण करण्यात आले .कर्तव्यदक्ष ठाणेदार गभणे यांनी तात्काळ नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन हे प्रकरण शांत चिंतेने कुठलेही गालबोट न लागता आटोक्यात आणण्याचे प्रशंसनीय कार्य केले. विशेष म्हणजे मागील महिन्यातच प्रहार संघटनेने डफली बजाओ आंदोलन करून प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे अनेक पदे रिक्त असून ती अजून पर्यंत भरलेली नाही. बरेच दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र हे समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहे. या आरोग्य केंद्रात औषधी निर्माता नसून कुठलाही कर्मचारी रुग्णांना औषधे देण्याचे कार्य करतो त्यामुळे एक प्रकारे हे आरोग्य केंद्र रुग्णांच्या जीवावर उठलेले आहे. या आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे चालू आहे.हे प्रकरण घडल्यानंतर कर्तव्यावर असणारे अधिकारी डॉक्टर मंगर आणि डॉक्टर निखिल कामडी यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या पोटनियम 4(1) अ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले. यात सर्वपक्षीय लोकांनी कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती त्यात डॉक्टर श्यामजी हटवादे(भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य), डॉक्टर सतीश वाजुरकर (जि प सदस्य तथा गटनेता), विलास डांगे (माजी जि प सदस्य), पंचायत समिती सभापती लता पिसे, सरपंच रेखाताई पिसे, मनोज मामीडवार(जि प सदस्य), चंद्रभान कामडी (उपसरपंच ग्रामपंचायत नेरी),ग्रा.पं. सदस्य निखील पिसे, ग्रा.पं. सदस्य पिंटू खाटीक, ग्रा.पं. सदस्य संदीप पिसे, संजय घुटके, तथा सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि नेरी मधील समस्त नागरिक उपस्थित राहून मागणी लावून धरली व त्यात यश सुद्धा आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close