ताज्या घडामोडी

‘बहुत हुई महंगाई की मार’ नारा देणाऱ्या भाजपचा सत्तेत सारंच महागल

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधात जनजागरण अभियान

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुराणकर खेमजई वरोरा

‘बहुत हुई महंगाई की मार’ असा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. सर्वच जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत, केंद्राचा भाजप सरकारने इंधनापासून ते अन्नधान्य सारंच महाग केलं आहे. याच महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने ‘जन जागरण अभियान’ हाती घेतले असून आपणही त्यात नक्की सहभागी व्हा, असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामस्थांना केले आहे. त्या वाढत्या महागाईविरोधात वरोरा तालुक्यातील खेमजई येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतुत्वात ‘जनजागरण अभियाना’ अंतर्गत काँग्रेसकडून फेरी काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलडरच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे छायाचित्रांचे फलक घेऊन, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या फेरीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी वरोरा तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती देवानंद मोरे, पंचायत समिती सभापती वरोरा रवींद्र धोपटे, पंचायत समिती उपसभापती संजीवनी भोयर, महिला तालुका अध्यक्ष रत्नमाला अहिरकर, दीपाली माटे, मीना राहाटे, युवक काँग्रेस अध्यक्ष वरोरा शुभम चिमुरकर, छोटू शेख, मनोहर स्वामी, वरोरा तालुका महासचिव दिवाकर निखाडे, सन्नी गुप्ता, संगीता आगलावे, प्रफुल असुटकर, राहुल नन्नावरे, राहुल देवडे, धम्मकन्या भालेराव, निखिल मांडवकर, हरीश जाधव, सरपंच खेमजाई मनीष चौधरी, उपसरपंच मोरे तसेच वरोरा तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, महिला शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमेटी, एन. एस. यु. आय विद्यार्थी सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, केंद्रातील भाजप सरकारने कृत्रीम महागाई वाढवून देशातील अर्थव्यवस्था उध्वस्त करून जनतेला जगणे मुश्किल केले आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांवरील अन्याय, लोकशाहीचे विद्रुपीकरण विरोध, घटना बचाव आदी मुद्दे घेऊन पुढे देखील प्रभावीपणे हे अभियान सुरु राहणार आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत केंद्रातील मोदी सरकारने केलेली महागाई व अर्थव्यवस्थेची दुरावस्था याबाबतची विस्तृत माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close