युवतीसेना समन्वयक सीमा लेडांगे यांचा सामाजिक उपक्रम
अहिल्याबाई होळकर वृद्राश्रमाला भेट देऊन साजरा केला वाढदिवस
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
युवासेना जिल्ह्या प्रमुख हर्षल शिंदे यानी वाढदिवसाच्या निमित्ताने अंध व्यक्तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करून तसेच वृद्धाश्रमात डेझर कूलर भेट देत साध्या पद्धतिने वाढदिवस केला, त्यांच्या पॉऊलावर पाय ठेवत युवतीसेना समन्वयीका सीमा लेंडागे यानी अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमात भेट देऊन साध्यापनात केला वाढदिवस साजरा.
मा.आदित्यजी ठाकरे युवासेनाप्रमुख व मंत्री महाराष्ट्र राज्य,युवासेना सचिव वरुनजी देसाई ,कार्यकारणी सदस्य शीतलताई देवरुखकर सेठ यांचे आदेशानुसार व सौ तुष्णाताई गुजर विस्तारक चंद्रपूर जिल्हा, श्री हर्षालभाऊ शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख यांचे मार्गदर्शनात सौ सीमा लेडांगे यांनी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम वरोरा येथे जाऊन तेथील वृद्धा सोबत साजरा केला त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमा ला 30 किलो तांदूळ भेट दिला व सर्व वृद्धांना फळे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. त्या वेळेस प्रमिलाताई लेडांगे माजी उपजिल्हाप्रमुख, अरुणा ताई मोडक, मनीषा जीवतोडे,रंजनताई चाफले उपस्थित होत्या.