शिवव्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा चे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शिवजन्मोत्सव च्या निमित्ताने भव्य दिव्य शिवव्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा 2025
आयोजित मराठा सेवा मंडळ परभणी यांच्यावतीने दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता स्थळ सुभाष रोड भजन गल्ली परभणी येथे भव्य दिव्य व्याख्यान होणार आहे महाराष्ट्रातले युवा शिवव्याख्याते ह भ प वैष्णव देशमुख तसेच बाल व्याख्याती आरोही खंदारे पाटील या दोघांचे भव्य दिव्य व्याख्यान होणारे या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी मराठा सेवा मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष नितीन देशमुख हे राहणार आहे तरीच प्रमुख पाहुणे राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आधी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते व बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत तरी परभणी जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मराठा सेवा मंडळ परभणी जिल्हाध्यक्ष गोविंद इक्कर पाटील यांच्यावतीने आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती शिवजन्मोत्सव समिती शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा आयोजक गोविंद भाऊ इक्कर पाटील यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.