ताज्या घडामोडी

पप्पुराज शेळके आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सम्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मानवी हक्क अभिमान परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके यांना बेटी फाऊंडेशन वाणी जि .यवतमाळ यांच्यावतीने दिला जाणारा सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल ‘आंतरराष्ट्रीय सेवारत्न’ पुरस्काराने बेटी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रिती दरेकर व इतर सन्मानित करण्यात आले.
देशभरातून सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा, पर्यावरण व कोविड क्षेत्रात उल्लेखनीय योगदान बद्दल 111 जनांची निवड केलेली आहे. त्यापैकी पप्पुराज शेळके याचीही निवड करण्यात आली होती .
मागील 22वर्षा पासुन दलित आदिवासी भूमीहीन शेतमजुर, अल्पसंख्यांक, व अतिक्रमित गायरान/वन जमिन व गाळपेरा जमिनधारकांना हक्क 7/12 मिळवून देण्यासाठी कर्मवीर अॅड. एकनाथराव अवाड साहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन काम करत आहेत.त्यांच्या नंतरही मानवी हक्क अभिमानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा डाॅ.मिलिंद अवाड यांच्या नेतृत्वाखाली आजही अविरतपणे काम चालू आहे.
यापूर्वी त्यांना मदत संस्था नागपुरचा राज्स्तरीय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रचा समाजरत्न पुरस्कार, राजवैद्य फाऊंडेशनचा राज्यस्तरीय सेवारत्न,तर साप्ताहिक महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे.
अंतरराष्ट्रीय पुरस्कार सेवारत्न मिळवल्याबद्दल मानवी हक्क अभिमान चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जे एन यु दिल्ली विद्यापीठाचे प्रो डाॅ. मिलिंद अवाड, खासदार फौजिया खान मॅडम,माजी खासदार अडव्हकेट तुकाराम रेंगे पाटील, मानवी हक्क अभिमान चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर, उद्योगजग अरूण, मराठे , राजेशभाऊ घोडे , रघुनाथ कसबे, अजमत खान, धोंडिबा हातागळे,विश्वनाथ गवारे, मारोती साठे,सईद अन्सारी ,यखीन शेख,साई अण्णा, दिपक भालेराव, बाबासाहेब पाईकराव,संतोष करवंदे व मानवी हक्क अभिमान परिवारासह तुळजापुर येथील मित्र परिवार व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close