ताज्या घडामोडी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजीतदादा पवार यांच्याकडे जिल्हयाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली. – माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजीतदादा पवार हे गडचिरोली जिल्हयाच्या दौ-यावर आले असता माजी आमदार तथा महासचिव महा.प्रदेश काॅग्रेस कमिटी व डी पी.डी.सी. सदस्य डाॅ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नामनिर्देशित डी.पी.डी.सी. सदस्यांनी पुष्पगुच्छ देवून मा.ना.अजीतदादा पवार यांचे स्वागत केले.
या निवदेनाच्या माध्यमातुन गडचिरोली जिल्हयाच्या आदिवासी नक्षलग्रस्त व आकांक्षीत जिल्हा असल्याने महाराष्ट्राच्या इतर जिल्हयाच्या विकासाच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा बराच माघारलेला आहे. गडचिरोली जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असुुन जिल्हयातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न कमी आहे. या जिल्हयात शिक्षणाचा, सिचंनाचा, आरोग्याचा व इतरही विकास कामांचा अनुशेष इतर जिल्हाच्या तुलनेत खुप मोठा आहे. त्याकरीता गडचिरोली जिल्हयातील शेतक-यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय उदा. दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कुकुटपालन, फळबाग लागवड इत्यादी योजना मोठया प्रमाणात राबवावे, शेतक-यांना धानाच्या बोनस ऐवजी, एकरी 10 हजार रुपये शेती लागवड पूर्वीच्या मशागती करीता अनुदान देण्यात यावे, गडचिरोली जिल्हयात 7 ते 8 वाहना-या नदया व नाल्यावर ब्रीज बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दयावे, गडचिरोली जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करावे व इतर ही जिल्हयातील विकासाचे मुद्दे यावर चर्चीले गेले. यावेळी माजी आमदार तथा महासचिव महा.प्रदेश काॅॅग्रेस कमिटी व डी पी.डी.सी. सदस्य डाॅ. नामदेव उसेंडी, जेष्ठ नेते हसनअली गिलानी, राष्ट्रवादी युवा नेते व डी.पी.डी.सी. सदस्य त्रतुराज हलगेकर, जिल्हाकोषाध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रभाकर वासेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व डी पी.डी.सी. सदस्य रवींद्र वासेकर, माजी जि.प. उपाध्यक्ष व डी पी.डी.सी. सदस्य जीवन नाट, डी पी.डी.सी. व सिचंन नेते राजगोपाल सुर्वोवार, शिवसेना नेत्या व डी पी.डी.सी. सदस्या कल्पनाताई तिजारे, डी पी.डी.सी. सदस्य युनुस शेख, काॅग्रेस पक्षाचे महासचीव सुनिल चडगुलवार, पंकज खोबे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close